![]() |
कृषी पंपांना दिवसा वीज देण्याच्या मागणीसाठी आज हलकर्णी फाटा (ता. चंदगड) येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढून अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. |
कृषी पपांना दिवसा वीज पुरवठा करणे, जळीत ऊस नुकसाण भरपाई लवकरात लवकर मिळावी, नवीन मिटर, वीज जोडणी त्वरीत मिळावी, धोकादायक जुने खांब, डीपी त्वरीत बदलाव्यात या सर्व मागण्यांसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रा. दिपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीच्या हलकर्णी फाटा (ता. चंदगड) येथील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता व्ही. एस. लोधी व सहाय्यक अभियंता एम. एस. पिसे यांना मागणीचे निवेदन देवून चर्चा करण्यात आली. यावेळी शेतीपंप वीजपुरवठा रात्रीचा बंद ठेऊन दिवसा चालु ठेवावा ही प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. शेतकरी जगला तर आपण सर्वजन जगतो त्यामुळे त्यांचे हाल करु नका अशी विनवणी शेतकऱ्यांनी केली. पण एकदा शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन त्याच्या व्यथा जाणुन घ्या असे प्रा. दिपक पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना सांगितले. यावेळी फोनवर श्री. लोधी यांनी सपंर्क साधला व मगळवारी २२ रोजी दुपारी १२ वा. शिवणगे ग्रामपंचायतीमध्ये वरीष्ठ अभियंत्यांच्या उपस्थित यावर तोडगा काढण्याचे सर्वानुमते ठरले. यावेळी शंभु पाटील, जनार्दन देसाई, गावडु पाटील, गजानन राजगोळकर, विश्वनाथ पाटील, लक्ष्मण मेणसे, प्रभु पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment