जिल्हा स्तरीय प्रश्नमंजूषा स्पर्धामध्ये तृतिय क्रमांक मिळवले वि .म. शिरोली चे विद्यार्थी पारितोषिक स्विकारताना. |
जिल्हा परिषद कोल्हापूर यांचेमार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धा 2018-19 मध्ये लहान गटात प्रश्नमंजुषा स्पर्धेत मराठी विद्यामंदिर शिरोली (ता. चंदगड) येथील शाळेने जिल्ह्यात तिसरा क्रमांक मिळविला. चंदगड तालुक्यातून वि. मं. शिरोली शाळेची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. शाहु स्मारक भवनामध्ये झालेल्या या स्पर्धेत शिरोली या शाळेने उज्वल यश संपादन केले. साईनाथ जिवबा पाटील, सृष्टी वासुदेव नलवडे, दिव्या सुनील पाटील या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. या विद्यार्थ्यांना सौ. सरिता नाईक यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्ताजीराव देसाई, उपाध्यक्ष जयवंत देसाई, मुख्याध्यापक श्री. गावडे, सर्व पालक आणि अडकुर केंद्राचे केंद्रप्रमुख क. ई. पाटील गटशिक्षणाधिकारी सौ. सुभेदार यांनी अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment