अडकूर आरोग्य केंद्रात आयोजित कलेल्या मोफत आरोग्य शिबिरात जि.प. सदस्य सचिन बल्लाळ यांचे स्वागत करताना डॉ . सोमजाळ व उपस्थित डॉ .मदने , सभापती बबन देसाई |
आरोग्य विभाग जिल्हा परिषद व प्राथमिक आरोग्य अडकूर ता . चंदगड यांच्या वतीने अडकूर येथे आयोजित केलेल्या जेष्ठ नागरीकांसाठी मोफत सर्व रोगनिदान शिबिराला प्रचंड प्रतिसाद मिळाला. चंदगड पंचायत समितीचे सभापती बबनराव देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या शिबीराचे उदघाटन चंदगड जि. प. सदस्य सचिन बल्लाळ यांच्या हस्ते झाले. या शिबिरामध्ये 284 रुग्णांची तपासणी करून मोफत उपचार करण्यात आली. स्वागत अडकूर प्रा. आ. केंद्राचे वैद्यकिय आधिकारी डॉ. बी. डी. सोमजाळ यांनी केले. डॉ. सी. जे. खोत, डॉ. शिवराज कुपेकर, डॉ. मिलिंद साळुंखे, डॉ. विजय बरगे, डॉ. एस. एस. साने, डॉ. धनंजय शिंदे, डॉ. अमित लवेकर, डॉ. पी. एन. पवार यांनी रुग्णांची तपासणी करून उपचार केले. या शिबिराला अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मदने, कृष्णकांत रेगडे, अभय देसाई, उपसभापती विठाबाई मुरकुटे, सरपंच यशोदा कांबळे यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिर यशस्वी होण्यासाठी सर्व आरोग्य सेवक, सेविका व आशा यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल शिंदे यानी केले. आभार डॉ. सोमजाळ यांनी मानले.
No comments:
Post a Comment