म्हाळेवाडी येथे 27 जानेवारीपासून राज्यस्तरीय सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

18 January 2019

म्हाळेवाडी येथे 27 जानेवारीपासून राज्यस्तरीय सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन


दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
कै. सौरभ पाटील चॅरीटेबल ट्रस्ट म्हाळेवाडी (ता. चंदगड) यांच्या मार्फत सालाबाद प्रमाणे राज्यस्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा  म्हाळेवाडी (ता. चंदगड) या ठिकाणी 27 जानेवारी २०१९ रोजी आयोजित केल्या आहेत. पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी या तीन गटात स्पर्धा होतील. अशी माहीती ट्रस्टचे अध्यक्ष शरद नांदवडेकर यांनी दिली. 
सकाळी 11 वाजता सुरु होणाऱ्या आठवी ते दहावी या मोठ्या गटासाठी 15 रुपये प्रवेश शुल्क असून 3500, 2500, 2000, 1500 अशी बक्षिसे आहेत. दुपारी 3 वाजता सुरु होणाऱ्या पहिली ते चौथीसाठी 10 रुपये प्रवेश शुल्क असून विजेत्यांना अनुक्रमे 1500, 1000, 701, 501, 351 अशी बक्षिसे आहेत. पाचवी ते सातवीसाठी 15 रुपये प्रवेश शुल्क असून विजेत्यांना अनुक्रमे 3000, 2500, 2000, 1500, 1000 अशी बक्षिसे आहेत. या स्पर्धेसाठी गतवर्षी चंदगड, आजरा, गडहिंग्लज या तीन तालुक्यातून 900 स्पर्धकांचा समावेश होता. यावर्षी ही स्पर्धा हजारोच्या घरात जातील असा या ट्रस्टचा मानस आहे. या वर्षी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप A, B, C, D, पद्धतीचे असल्याने स्पर्धकांत मोठा उत्साह आहे. स्पर्धेच्या अधिक माहीतीसाठी इच्छुकांनी 9921449334 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. 

No comments:

Post a Comment