आमरोळी येथे पाणंद रस्ता खुला करताना जमलेले ग्रामस्थ व पदाधिकारी. |
चंदगड / प्रतिनिधी
आमरोळी (ता. चंदगड) येथील चंदगड-गडहिंग्लज मार्गापासून केंचेवाडी हद्दीपर्यंत पाणंद रस्ता करण्यास सुरुवात केली आहे. चंदगडचे तहसीलदार तथा न्यायदंडाधिकारी शिवाजी शिंदे यांच्या आदेशानुसार नागनवाडी सज्याचे सर्कल सौ. राजश्री पांचडी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांच्या सहकार्याने पाणंद रस्ता वाहतुकीला खुला करण्यात आला. आमरोळी व ग्रुप ग्रामपंचायत मधील पाणंद रस्ते अशाच पध्दतीने खुले करण्याचे ठरवले. या करिता उद्योजक महादेवराव मंडलिक- पाटील, सरपंच सौ. सुवर्णा महादेव मंडलिक-पाटील, उपसरपंच सौ. संगीता तुकाराम नाईक, ग्रा. प. सदस्य, ग्रामसेवक आर. डी. जोशी व नागरिक यांच्या सहकार्याने पाणंद ररस्ता वाहतुकीला खुला झाला. यावेळी टायगर ग्रुप व मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment