![]() |
सरोळी (ता. चंदगड) येथील सुमन पाटील यांनी कोलंबिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यींनी सराह जॉन्सन सुमन पाटील यांच्याकडून माहीती घेताना. |
चंदगड / प्रतिनिधी
तालुक्यातील हेमरस साखर कारखान्याच्या माध्यमातून कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना `बोन्सुक्रो` या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या धोरणानुसार ऊस उत्पादन करण्याचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. येथील असंख्य शेतकऱ्यांनी पर्यावरणपूरक अशा पध्दतीने भरघोश ऊस पिक घेतले आहे. `बोन्सुको` या संस्थेच्या कामाची दखल घेवून अमेरिकेतील कोलिंबिया या विद्यापीठातील सराह जॉन्सन व आनंदिता दोन विद्यार्थ्यांनी चंदगड तालुक्यातील सरोळी येथील नारायण पाटील व सुरुते येथील मारुती पाटील यांच्या ऊस उत्पादनाची माहीती घेतली.
कोलिंबिया विद्यापीठातील या विद्यार्थ्यींनीनी ऊस उत्पादनाबाबत अनेक प्रश्न सुमन पाटील, नारायण पाटील व मारुती पाटील या शेतकऱ्यांना विचारले. पर्यावरण व जमिनीचा समतोल राखणे, पाण्याचा वापर कमी करणे आवश्यकतेनुसार खतांचा व औषधांचा वापर करणे, सेंद्रीय खतांचा वापर करणे, शेती करताना आरोग्याची काळजी घेणे, महिलां मजुरांना पुरुषाप्रमाणे समान वागणूक देणे, 18 वर्षाखालील मुलांना कामाला न घेणे, मजुरांना पिण्याचे शुध्द पाणी पुरविणे आदी बाबींचा अवलंब करत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. पर्यावरणाला धोका पोहोचणार नाही अशी शेती सर्वांनी केली पाहिजे, सरकारचे नियम व कायदे पाळले पाहिजेत असा मंत्र विद्यापीठातील विद्यार्थ्यींनींनी दिला. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत `बोन्सुक्रो` या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या मार्गदर्शनाप्रमाणे ग्रामीण भागातील शेतकरी ऊसाचे उत्पादन घेत असल्याचे पाहून पाहुणे विद्यार्थ्यी भारावून गेले. त्यांनी शेतकऱ्यांचे व हेमरस साखर कारखान्याच्या शेती अधिकाऱ्यांचे कौतुक केले. यावेळी सुधीर पाटील, विश्वजीत शिवनगेकर, राजू सुतार, प्रदिप पाटील, आनंदा कुंभार, कुमार पाटील, नारायण भाटे, हर्षवर्धन कोळसेकर, बाबु चौगुले, ईश्वर पाटील, मनोहर पाटील, प्रज्योत पाटील, अशोक पाटील आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment