मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथे होण्यासाठी तहसिलदारांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

17 January 2019

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथे होण्यासाठी तहसिलदारांना निवेदन

कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे या मागणीचे निवेदन तहसिलदार शिवाजी शिंदे यांना देताना चंदगड तालुका बार असोशिएशनचे पदाधिकारी. 
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुका बार असोशिएशन, पक्षकार व नागरिकांच्या वतीने कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथे व्हावे अशी मागणी आहे. याबाबत चालढकल केली जात असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचा निषेध व्यक्त करणारे निवेदन आज चंदगड तहसिलदारांना देण्यात आले. 
या निवेदनात म्हटले आहे की, ``मुंबईत उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथे झाल्यास कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदूर्ग, रत्नागीरी या जिल्ह्यातील सर्वांना सोईस्कर होणार आहे. या मागणीसाठी गेली तीस वर्ष सर्व बार असोशिएशनचे प्रयत्न सुरू आहेत. या मागणीसाठी अलिकडील काळात २०१६ मघ्ये तब्बल ५८ दिवस खडतर आंदोलन करण्यात आले होते. सातत्याने वाढती मागणी होवुनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मुख्यमंत्री यांनी याबाबत काहीच हालचाल न केल्यामुळे चंदगड तालुका बार असोशिएशन, पक्षकार व नागरिकांच्या वतीने गुरूवारी चंदगड तहसिलदारांना मुख्यमंत्र्यांचा निषेध व्यक्त करणारे निवेदन देण्यात आले. यावेळी चंदगड तालुका बार असोशिएशनचे ॲड. सुरूतकर, उपाध्यक्ष ॲड. कडूकर, ॲड. व्ही. आर. पाटील, ॲड. अनंत कांबळे, ॲड. एन. एन. गावडे, ॲड. संदीप पाटील, ॲड. एस. एल. पाटील, ॲड. भातकांडे, ॲड. पी. बी. पाटील, ॲड. रवी रेडेकर आदीसह पक्षकार व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


No comments:

Post a Comment