दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
कृषी पपांना दिवसा वीज पुरवठा करणे, जळीत ऊस नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी, नवीन मिटर, वीज जोडणी मिळावी, धोकादायक जुने खांब, डीपी त्वरीत बदलाव्यात या सर्व मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेमार्फत महाराष्ट्र राज्य वितरण कपंनीच्या हलकणी फाटा (ता. चंदगड) येथील कार्यालयावर आज शुक्रवार १८ जानेवारी 2019 रोजी मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहीती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रा. दिपक पाटील यांनी दिली.
सध्या महावितरण कडून वेळीअवेळी भारनियमन केले जाते. दिवसा विजपुरवठा बंद तर रात्री सुरू. रात्रीच्या विज पुरवठ्याचा शेतकऱ्यांना काहीच उपयोग नाही. सद्या ऊस लागवड व मिरची लागवडीची कामे जोरात सुरु आहेत. ही कामे दिवसाचीच करावी लागतात. पण दिवसाचा विज पुरवठा नसल्यामुळे शेतकऱ्यांचे फार नुकसान होत आहे. त्याचबरोबर गावागावातुन बरेच लोखंडी विद्युत खांब गंजून मोडकळीस येऊण धोकादायक बनले आहेत. या सर्वांचा जाब विचारण्यासाठी उद्या दुपारी १२ वाजता हलकर्णी फाटा येथे तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या सख्येंने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रा. पाटील यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment