उमगाव येथे शिवप्रतिष्ठान महिला संघटनेच्या वतीने गावाची स्वच्छता - चंदगड लाईव्ह न्युज

19 January 2019

उमगाव येथे शिवप्रतिष्ठान महिला संघटनेच्या वतीने गावाची स्वच्छता

        उमगाव (ता. चंदगड) येथे शिवप्रतिष्ठान महिला संघटनेच्या वतीने यात्रेनिमित्त गावाची स्वच्छता करण्यात आली. 

चंदगड / प्रतिनिधी 
उमगाव (ता. चंदगड) येथील ग्रामदैवत श्री स्वयंभू देवाची यात्रा 21 जानेवारी 2019 रोजी होत आहे. या निमित्त गावातील शिवप्रतिष्ठान महिला संघटनेच्या वतीने शनिवारी देवालय परिसरासह संपुर्ण गावाची स्वच्छता करण्यात आली. या स्वच्छता उपक्रमामध्ये गावातील महिला मोठ्या संख्येने हातात झाडू व बुट्या घेवून उत्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या. यात्रेनिमित्त पालखी व आरती मिरवणूक होणार आहे. भाविकांनी यात्रेला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे. 

No comments:

Post a Comment