किणी येथे संक्रांती निमित्त तिळगुळ व शैक्षणिक साहित्य वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

19 January 2019

किणी येथे संक्रांती निमित्त तिळगुळ व शैक्षणिक साहित्य वाटप


दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
किणी (ता. चंदगड) येथे मकर संक्रांती निमित्य प्रगती तनिष्का गटामार्फत जयप्रकाश विद्यालय, मराठी विद्या मंदिर तसेच अंगणवाडीमध्ये तिळगुळ व शैक्षणिक साहीत्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. शितल कुट्रे होत्या. 
प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास पाटील यांनी केले. जयप्रकाश विद्यालयाचे मुख्याद्यापक पाडुंरग मोहणगेकर यांनी सक्रांतीचे महत्त्व आपल्या मनोगतातुन व्यक्त केल्या. यावेळी पतंग महोत्सव व फॅन्सी ड्रेस स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यावेळी तनिष्का गटाच्या सौ. अनिता नादुंडकर यांनी गटाच्या स्तुत्य कार्याचा आढावा वाचन केला. यावेळी दिलीप बिर्जे, सुरेश कदम,  सौ. सुजाता पाटील,  सौ. लता पाटील,  श्रीमती मगंल पाटील,  सौ. वासंती गवंडी,  सौ. सुमन मनवाडकर, नमिता पाटील, अंजलीना लोबो, नीता नादुंडकर, रेखा तरवाळ, तनिष्का गटाच्या सर्व सदस्या व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार सौ. लीना लोबो यांनी मानले.


No comments:

Post a Comment