मुरकुटेवाडी येथे संभाजी महाराजांचा राज्यभिषेक सोहळा संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

19 January 2019

मुरकुटेवाडी येथे संभाजी महाराजांचा राज्यभिषेक सोहळा संपन्न


दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
शिवशंभु प्रतिष्ठान मुरकुटेवाडी (ता. चंदगड) येथे श्री संभाजी महाराजांचा राज्यभिषेक सोहळा मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासुन भव्य मिरवणुकीला सुरवात झाली. यावेळी उपसभापती सौ. विठाबाई मुरकुटे याच्या हस्ते संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक घालण्यात आला. पुतळा पुजन ग्रामपचांयत सदस्य मल्लाप्पा देसाई याच्या हस्ते झाले. यावेळी शंभुराजेंचा इतिहास प्रा. एस. व्ही. जाधव यांनी आपल्या व्याख्यानातुन सांगितला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस पाटील सखाराम जाधव होते. यावेळी सौ. शुभांगी मुरकुटे, सरपंच मुरकुटेवाडी, सुरेश सुभेदार, संगिता गोजगेकर, आरती जाधव, शिला चव्हाण, वदंना दळवी, लक्ष्मण पाटील, परशराम गोजगेकर, आप्पाजी देसाई अदि सर्व ग्रामस्य उपस्थित होते. आभार शशिकांत पेडणेकर यांनी मांडले.


No comments:

Post a Comment