चंदगड तालुक्यात ठिकठिकाणी शाळा सिद्धी कार्यशाळा संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

19 January 2019

चंदगड तालुक्यात ठिकठिकाणी शाळा सिद्धी कार्यशाळा संपन्न

कोवाड (ता. चंदगड) येथे शाळा सिध्दी व ऑनलाईन माहिती भरण्यासाठी मुख्याध्यापकांच्या कार्यशाळा झाली. 
कालकुंद्री / प्रतिनिधी 
शिक्षण विभाग पंचायत समिती चंदगड यांच्या वतीने चंदगड तालुक्याच्या विविध भागात शाळा सिद्धि माहिती व ऑनलाईन माहिती भरण्यासाठी मुख्याध्यापकांच्या कार्यशाळा उत्साहात पार पडली. कोवाड येथील श्रीराम विद्यालयात पार पडलेल्या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य ए. एस. पाटील होते. 
तज्ञ मार्गदर्शक वाय. के. चौधरी (केंद्रप्रमुख हलकर्णी), सुनील धबाले (अध्यापक जंगमहट्टी धनगरवाडा), हिंदुराव कदम (अध्यापक दौलत हलकर्णी) यांनी शाळा सिद्धि स्वयंमूल्यमापन फॉर्म मधील सात क्षेत्र व त्यातील मानके यांचे गुणदान कसे घ्यावे? याबद्दल माहिती दिली. यामध्ये शाळांचा दर्जा वाढवून उच्चश्रेणी प्राप्त करण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक,शाळा व्यवस्थापन समिती, पालक व ग्रांमस्थ यांचा समन्वय राखण्याचे आवाहन केले. यावेळी केंद्रप्रमुख विलास कांबळे, वाय. आर. निट्टूरकर, डी. आय. पाटील, केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत पाटील आदींसह कोवाड, कुदनुर, कालकुंद्री या केंद्रातील प्राथमिक व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक उपस्थित होते. याचप्रमाणे तालुक्यातील तुर्केवाडी, अडकूर, चंदगड येथे कार्यशाळा घेऊन 19 केंद्रातील मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करण्यात आले. याकामी गटशिक्षणाधिकारी सौ. सुमन सुभेदार यांचे मार्गदर्शन लाभले.


No comments:

Post a Comment