![]() |
कोवाड : येथे श्री राम ऑटो सर्व्हिस सेंटरचे उद्घाटन करताना जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील ,मुकुंद देसाई , अशोकराव देसाई व इतर . |
कोवाड / प्रतिनिधी
नवनवीन तंत्रज्ञान व आधुनिकरणामुळे जागतिकस्तरावर नोकऱ्यांचे प्रमाण कमी होत आहे. तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता संघटीत होऊन शेती पुरक व्यवसाय व उद्योगातील संधी शोधून स्वतःच्या पायावर उभे राहावे, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राजेश पाटील यांनी केले. तसेच राहुल देसाई यांनी सुरू केलेल्या श्री राम ऑटो सर्व्हीस सेंटरमुळे कोवाड (ता. चंदगड) भागातील वाहनधारकांची सोय झाल्याचे सांगितले .
येथे राहूल देसाई यांनी नव्याने सुरू केलेल्या होंडा कंपनीच्या श्री राम ऑटो सव्र्हिस सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थांनी जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई होते. माजी आमदार संपतबापू पाटील, जयवंत शिपी उपस्थित होते अशोकराव देसाई यांनी उपस्थितांचे स्वागत केले. मुकुंद देसाई यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण झाले .राजेश पाटील यांच्या हस्ते सर्हिस सेंटरचे उद्घाटन झाले. ग्रामीण भागातील तरूण उद्योग व्यवसायाकडे वळत असल्याने आश्वासक वातावरण निर्माण झाल्याचे सांगताना राजेश पाटील यांनी कोवाड परिसरात वाहनांची संख्या जास्त असल्याने या सव्र्हिस सेंटरचा वाहनधारकांना नक्की लाभ होईल, असे सांगितले. संपतबापू पाटील म्हणाले, ''रोजगार निर्मितीकडे सरकरचं लक्ष नाही .सामान्य लोकांच्या वेदनाना फक्त मलमपट्टी करण्याच्या धोरणामुळे देशात बेकारी वाढत असल्याचे सांगून लोकशाही बळकट करण्यासाठी समाज निर्भय झाला पाहिजे. शेतीवरचा भार कमी करण्यासाठी तरुणानी व्यवसायाकडे वळावे" यावेळी संदीप कोळकी, प्रविण मालवडे, पवन पवार, किर्तीकुमार देसाई, नंदकुमार भोसले, विरसिंह भोसले, हर्षल सोनटक्के, वसंत सुतार, पारु नाईक, ए. एस. पाटील, दिग्विजय देसाई, डॉ. रमाकांत जोशी उपस्थित होते. आर. व्ही. व्हन्याळकर यांनी सुत्रसंचालन केले .राहुल देसाई यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment