तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत सोनारवाडी शाळा खो-खो मध्ये प्रथम - चंदगड लाईव्ह न्युज

03 January 2019

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत सोनारवाडी शाळा खो-खो मध्ये प्रथम


कोवाड / प्रतिनिधी
दाटे (ता. चंदगड) येथे झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत सोनारवाडी विद्यामंदिर शाळेच्या मुलींच्या संघाने मोठ्या गटात खो-खो मध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. सलग तीन वर्षे शाळेने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. विजयी संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.  वैयक्तिक क्रीडा प्रकारात अजित सुबराव पाटील यांनी पाटील यांनी ६०० मीटर धावणे क्रीडा प्रकारात  प्रथम, थाळीफेक मध्ये द्वितीय  क्रमांक मिळविला. ऋतिका मेंगुलकर १०० मीटर धावणे तृतीय, मारुती सदाशिव गावडे ४०० मीटर धावणे तृतीय क्रमांक पटकाविला. यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दयानंद पाटील, मुख्याध्यापक लक्ष्मण आबीटकर, मारुती चिंचणगी, अशोक पाटील, अमोल गुरव, श्रीमती सरिता मर्णहोळकर यांनी अभिनंदन केले. क्रीडा शिक्षक सागर मोरे यांचे विद्यार्थ्याना मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment