लोकनेते तुकाराम पवार यांचे कार्य दीपस्तंभासारखे - प्रा. एम. एम. जमादार - चंदगड लाईव्ह न्युज

03 January 2019

लोकनेते तुकाराम पवार यांचे कार्य दीपस्तंभासारखे - प्रा. एम. एम. जमादार

कालकुंद्री येथे तुकाराम पवार यांच्या जयंतीनिमित्य प्रतिमापूजन करताना प्रा . जमादार, एस एल बेळगावकर आदि.
तेऊरवाडी / प्रतिनिधी    
तळागाळातील लोक शिकले तरच समाज उभा राहील. यासाठी खेडूत शिक्षण मंडळ कालकुंद्रीची स्थापना करून शिक्षणाची सोय करण्यासाठी श्री सरस्वती विद्यालयाच्या उभारणीत तुकाराम दत्ताजी पवार यांनी दीपस्तंभाप्रमाणे काम केले असे विचार प्रा. एम. एम. जमादार यांनी लोकनेते तुकाराम पवार यांच्या 94 व्या जंयती निमित्य कालकुंद्री (ता. चंदगड) येथे बोलताना व्यक्त केले. प्रा. जमादार यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. डॉ. राहुल पवार व डॉ. ऋषीकेश पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. यावेळी प्र. प्राचार्य सी. बी. निर्मळकर यांनी लोकनेते तुकाराम पवार यांच्या समाजकार्याचा आढावा घेतला. डॉ. राहूल पवार यांनी विद्यालयासाठी भरीव कार्याची ग्वाही दिली. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर वृंद उपस्थित होते. सुत्रसंचालन एस. एल. बेळगांवकर यांनी केले. आभार ई. एल. पाटील यांनी मानले. 


No comments:

Post a Comment