माणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित नेत्र तपासणी शिबीराचे उदघाटन करताना सरपंच सौ. अश्चिनी कांबळे, डॉ. स्नेहा हिरेमठ. |
माणगाव / प्रतिनिधी
माणगाव (ता. चंदगड) येथे ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन माणगावच्या सरपंच सौ. अश्विनी जयवंत कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच बाबु दुकळे, तंटामुक्त अध्यक्ष जयवंत सुरुतकर, ग्रामपंचायत सदस्य संभाजी कुंभार, गुंडू मेटकूपी, विकास पाटील, बाळू नाईक, सौ. पार्वती चिंचणगी, सौ. भारती गावडे, सौ. कमल होनगेकर, कल्पना फडके, नारायण गावडे ग्रामसेवक एम. बी. दोरूगडे यांच्यासह ग्रामस्थ व नेत्ररुग्ण उपस्थित होते. आदिशक्ती समालोचना बेळगाव यांच्यामार्फत डॉ. स्नेहा हिरेमठ यांनी नेत्रतपासणी केली. या शिबिराचा जवळपास शंभरहून अधिक नेत्ररूग्णांनी लाभ घेतला.
No comments:
Post a Comment