दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
श्रमदानाबरोबर विवीध सस्कांराची रुजवण आपल्यात झाली पाहीजे आणि ती श्रमसस्कांर शिबिरातुन होत असते. व्यक्तीमत्त्व घडवण्याचे व्यासपिठ म्हणजे 'राष्ट्रीय सेवा योजना' चरीत्र्य सपंन्न विद्यार्थी एनएसएस मध्ये घडतात. हिच मुले पुढे विवीध क्षेत्रात चमकतात. या शिबिरातुन आपण सर्वांणी घेतलेली शिदोरी पुढील आयुष्यात कायम ठेवा" असे प्रतिपादन दौलत विश्वस्त संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील यांनी केले. यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरुवर्य गुरुनाथ विठ्ल कनिष्ठ विद्यालयाच्या डुक्करवाडी (ता. चंदगड) येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या सांगता समारोप प्रसंगी बोलत होते.
स्वागत सरपंच राजु शिवणगेकर, उपसरपंच सौ. मनिषा वरपे, राणबा ढेरे यांनी केले. प्रास्ताविक प्रा. एन. एम. कुचेकर यांनी केले. डुक्करवाडी येथे उत्कृष्टरित्या श्रमसस्कांर शिबिर आयोजन केल्याबदद्ल ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने महाविद्यालयाला सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्राचार्य निबांळकर म्हणाले, " स्वच्छ भारत सुंदर भारत या शिबीरातुन जममानसात पोहचवत असतो. वर्षानुवर्षे राहीलेले काम या शिबीरातून होते हीच यशस्वीता शिबिराची होय. श्रमाची प्रतिष्ठा आणि महत्त्व पटवुन देण्याचे काम हे शिबीर करते. व्यक्तीमत्त्व विकासाची जडण- घडण यातुन होत असते. समाजात एकोप्याने राहील्याने समाजाच्या अडीअडचणी युवकाकडुन समजाऊण घेतल्या जातात. भावी आयुष्यात शिबीरातील सस्कार उपयोगी पडतात. ``यावेळी शिबिरातील स्वयसेवक कु. पृथ्वी वांद्रे, दिपक कांबळे, संजिवणी कांबळे, श्रीकांत कांबळे, मनिषा पाटील यांनी यावेळी मनोगते व्यक्त केली. उत्कृष्ट नियोजनाबद्दल प्रकल्प अधिकारी प्रा. डॉ. मधुकर जाधव, कनिष्ठ प्रकल्प अधिकारी प्रा. एम. एन. कुचेकर, प्रा. सौ. सुप्रिया यादव, प्रा. नंदकुमार पाटील, प्रकाश बागडी, गोविंद नाईक याचां ग्रामपचांयत व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपचांयतीचे सर्व सदस्य, सोसायटी अध्यक्ष, उपाध्यक्ष,सचांलक, विवीध सस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. सुत्रसचांलन प्रा.पी.एन. पाटील यानी तर आभार प्रा. मधुकर जाधव यांनी मांडले.
No comments:
Post a Comment