गौळवाडी प्राथमिक शाळेचा संघ मुलींच्या कबड्डीमध्ये तालुक्यात प्रथम - चंदगड लाईव्ह न्युज

03 January 2019

गौळवाडी प्राथमिक शाळेचा संघ मुलींच्या कबड्डीमध्ये तालुक्यात प्रथम

गौळवाडी (ता. चंदगड) येथील कबड्डीमध्ये प्रथम क्रमांक विजेता मूुलीचा संघ.
चंदगड / प्रतिनिधी 
गौळवाडी (ता. चंदगड) येथील प्राथमिक शाळा मुलींच्या संघाने दाटे केंद्रामध्ये घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय मुलींच्या लहान गटामध्ये कब्बड्डीमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. तर 50 मीटर धावणे प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांना केंद्राचे केंद्रप्रमुख धो. ई. पाटील, केंद्र मुख्याध्यापक एन. वि. पाटील, मुख्याध्यापक विनोद कोरवी, मार्गदर्शक अनिता चौगूले, प्रमोद ओऊळकर, अध्यक्ष अमृत बोकडे यांच्यासह पालक यांचे  मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment