सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघाची रविवारी पाटणे फाटा येथे बैठक - चंदगड लाईव्ह न्युज

03 January 2019

सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघाची रविवारी पाटणे फाटा येथे बैठक


कालकुंद्री / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक व कुटुंब निवृत्ती वेतनधारकांची बैठक रविवार दिनांक 6 जानेवारी 2019 रोजी दुपारी 12 वाजता चव्हाण पाटील महाविद्यालय पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती चंदगड तालुका सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष वसंत जोशीलकर यांनी दिली आहे. या बैठकीमध्ये हयातीचे दाखले, निवड श्रेणी, सातवा वेतन आयोग याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे. तरी सर्व सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक व कुटुंब निवृत्ती वेतन धारकांनी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन चंदगड तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष शि. ल. होनगेकर, सचिव शं. धो. माने, उपाध्यक्ष तु. रा. पाटील, खजिनदार सुबराव गुंडप यांनी केले आहे. 


No comments:

Post a Comment