किटवाड शाळेच्या मुलींच्या कब्बड्डी संघाची जिल्हास्तरीय स्पधेसाठी निवड - चंदगड लाईव्ह न्युज

03 January 2019

किटवाड शाळेच्या मुलींच्या कब्बड्डी संघाची जिल्हास्तरीय स्पधेसाठी निवड

किटवाड (ता. चंदगड) येथील विजेत्या मुलींच्या संघासह शिक्षक व इतर. 

दौलत  हलकर्णी / प्रतिनिधी
किटवाड (ता. चंदगड) येथील प्राथमिक शाळेने तालुकास्तरीय क्रिडा स्पधेत विविध खेळात घसघसीत यश संपादन करत सलग चौथ्या वर्षीही कब्बडी खेळासाठी जिल्हा पातळी निवडीची परंपरा कायम ठेवली आहे. शाळेने खालील खेळात यश सपांदन केले. वरीष्ठ गट कब्बडी प्रथम क्रमांक - शुभम ओमाणा पाटील वरीष्ठ गट १०० मिटर धावणे प्रथम क्रमांक, थाळीफेक मध्ये प्रथम क्रमांक, गोळाफेक द्वितीय, वर्षा मल्लाप्पा लाड वरीष्ठ गटात उंच उडी प्रथम, मयुरी वासुदेव दिंडे गोळाफेक प्रथम, श्रावण राजाराम पाटील यांने कुस्ती (३० किलो) प्रथम, सौरभ भावकाणा पाटील उंच उडी तृतीय क्रमांक, अथर्व केदारी तेऊरवाडकर याने कुस्ती (२५ किलो) द्वितीय क्रमांक पटकावला आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्वच स्थरातून कौतुक होत आहे.


No comments:

Post a Comment