ग्रामविकासामध्ये युवकांचा सहभाग हवा - गटविकास अधिकारी आर. बी. जोशी - चंदगड लाईव्ह न्युज

03 January 2019

ग्रामविकासामध्ये युवकांचा सहभाग हवा - गटविकास अधिकारी आर. बी. जोशी

अडकूर (ता. चंदगड) येथे श्रमसंस्कार शिबारीवेळी बोलताना गटविकास अधिकारी आर .बी. जोशी.
अडकूर / प्रतिनिधी
शहरांचा विकास प्रचंड गतीने होत असला तरीही ग्रामिण भाग मात्र विकासापासून वंचित आहे. गावाकडून शहराकडे स्थलांतरन होत असल्याने शहरांच्या समस्येत प्रचंड वाढ होत आहे. तर ग्रामीण भागाचा विकासही संथपणे चालू असल्याने इकडेही समस्या वाढत चालल्या आहेत. यासाठी जर ग्रामीण भागाचे चित्र बदलायचे असेल तर ग्रामविकासामध्ये युवकांचा सहभाग असणे खूप महत्वाचे असल्याचे प्रतिपादन चंदगड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आर. बी. जोशी यांनी केले. श्री शिवशक्ती हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज अडकूर (ता. चंदगड) चे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिर चालू आहे. यावेळी श्री. जोशी श्रम संस्कारात युवकांचा सहभाग या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच यशोदा कांबळे होत्या.         
स्वागत प्रकल्प अधिकारी प्रा. एम. पी. पाटील यांनी केले. यावेळी सौ. लक्ष्मी गुरव, सौ. सुजाता इंगवले, एस. के. हरेर, एस. के. पाटील, पर्यवेक्षक एस. जी. पाटील आदी मान्यवर व शिबीरार्थी विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन आर. व्ही. देसाई या.नी केले तर आभार सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रा. व्ही. पी. पाटील यांनी मानले.

No comments:

Post a Comment