![]() |
चंदगड तालुक्यात ऊसतोड मशिन हार्वेस्टरचे शेतकऱ्यांकडून होत असलेले स्वागत. |
निवृत्ती हारकारे / कार्वे
चंदगड तालुक्यात सध्या उसाची तोडणी युद्ध पातळीवर सुरु आहे. बीड परिसरातील ऊस
तोडणारे मजूर व स्थनिक पातळीवरील टोळ्यांच्या माध्यमातून उसाची तोडणी सुरु आहे. बऱ्याच ठिकाणी बीड च्या टोळीकडून व स्थानिक पातळीवरील ऊस तोड टोळ्यांकडून ऊस
उत्पादकांची लुट सुरु आहे. एका ट्रीपला ४०००
ते ५००० रुपये पर्यंत पैसे मागितले जात आहेत.एकीकडे गाळपासाठी गेलेल्या
उसाला पहिला हप्ता मिळाला नाही व दुसरीकडे अशा पद्धतीने लुट सुरु असल्याने येथील
शेतकरी धर्मसंकटात सापडला आहे. हेमरस साखर कारखान्याकडून मात्र यावर उपाय काढून गडहिंगलज तालुक्यातील बटकनगले
येथील धैर्यशील अशोकराव जाधव व संदीप जोतीबा रेडेकर यांच्या मालकीचे ऊस तोड यंत्र
(हार्वेस्टर) चंदगड तालुक्यात आणले आहे. यामुळे ना तोडणी खर्च ना इतर खर्च.
त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक बचत होत आहे.
हे ऊस तोडणी यंत्र दिवसा १०० ते १५० टन
इतका ऊस तोडू शकते.या सारखे अनेक फायदे हे यंत्र शेतकर्यांना करून देत आहे.यामध्ये
या यंत्राच्या तोडणीमुळे शेतातील उसाचे पाचट एकदम तुकडे होऊन पडते.त्यामुळे
पाचटाला आग लावण्याची जरुरी नाही.हे पाचट शेतात कुजल्याने शेतामध्ये सेंद्रिय खत
तयार होते. या सेंद्रिय खतामुळे शेतातील पुढील पिक जोमदार येण्यास मदत होते. या
मशीनने उसाची तोडणी केल्यामुळे तोडणी इतकी चांगल्या पद्धतीने होते उसाची तोड
जमिनीलगत होत असल्याने पुढील वर्षी या उसाचे येणारे खोडवे, निड्वे उत्तम प्रकारे
येते. उसाची तोड एकदम जमिनीबरोबर होते, त्यामुळे एकत्र खोडवे चांगले येते व वजन
जास्त येते. नुकसान होत नाही. या ऊस तोडणी मशीन बरोबर ६ डबल ट्रोली ट्रक्टर
आहेत.या ट्रक्टरना हेमरस साखर कारखान्याने थ्रू पास दिल्याने उसाची तोडणी झाल्यावर
जास्तीत जास्त ९ तासांच्यावर ऊस गाळपाचा थांबत नाही.त्यामुळे ही उसाच्या वजनात फरक
पडत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. १०० ते १५० टन प्रती दिनी ऊस तोडण्याची क्षमता या
मशीनची आहे. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांचे उसाचे क्षेत्र जास्त असण्याची गरज आहे. कमी क्षेत्र असल्यास मशीन फिरण्यास अडचणी
निर्माण होतात.
सध्या ही मशीन शिवनगे येथे सुरु आहे.मशीनने ऊस तोडणी केली जाते.हे पहाण्यासाठी परिसरातील शेतकर्यांनी गर्दी केली
आहे. या मशीनने उसाचे ८ इंचाचे तुकडे केले जातात.हे तुकडे ट्रक्टर च्या
ट्रोलीमध्ये भरले जातात.या साठी कारखान्याकडे वाहतूक करणारे ट्रक्टर सोडून इतर
हायड्रोलिक सिस्टीम असलेले दोन ट्रक्टर वापरले जातात. या ट्रक्टर मधूनच वाहतूक
करणाऱ्या ट्रक्टर ट्रोली मध्ये तोडलेला ऊस
भरला जातो.एकंदरीत या ऊस तोडणी यंत्रामुळे शेतकऱ्यामधून मात्र समाधान व्यक्त केले
जात आहे.स्वताचा ऊस लवकर तोडला जावा यासाठी प्रत्येक जण प्रयत्नात असल्याचे चित्र
सध्या या परिसरात दिसत आहे.या ऊस तोडणी मशिनच्या चंदगड तालुक्यातील आगमनामुळे
तालुक्यातील इतर ऊस तोडणी ठेकेदार संभ्रमात आहेत. बीड,उस्मानाबाद,लातूर,नांदेड
परिसरातील ऊस तोडणी मजूर यापुढे आणावेत, काय ६ – ७ ऊस तोडणी ठेकेदारांचे ग्रुप
करून अशी ऊस तोडणी मशीन आणावी या संभ्रमात हे ऊस वाहतूक ठेकेदार आहेत. या पूर्वी
बर्याचदा या ऊस तोडणी मजुरांच्या ठेकेदारांनी या ऊस वाहतूक ठेकेदारांना पैसे
बुडवून जेरीस आणले आहे.कित्येकांचे लाखो रुपये बुडाले आहेत. कित्येक जण कंगाल झाले
आहेत.अनेकांनी तर हा व्यवसाय सोडून दिला आहे. तालुक्याची अस्मिता असलेली दौलत बंद
झाल्यानंतर या वाहतुक ठेकेदारानी अनेक कारखान्यांचे पर्याय तपासून पहिले
आहेत.तालुक्यातील साखर कारखान्यासह इतर अनेक कारखान्यांना ऊस पुरवठा करून पहिले
आहे. मात्र या दरम्यान अनेकवेळा या ऊस
तोडणी मुकादमाकडून या वाहतूक ठेकेदारांची फसवणूकच झाली आहे.त्यांमुळे हे ठेकेदार
सध्या या ऊस तोडणी मशीन बाबत गांभीर्याने विचार करीत आहेत.त्यामुळे येणार्या
कालावधीत अश्या हार्वेस्टर मशीन दिसण्याची शक्यता दाट आहे. मात्र यामुळे ऊस
उत्पादकांचा असाच फायदा होत रहावा हीच अपेक्षा.
![]() |
निवृत्ती हारकारे, कारवे |
No comments:
Post a Comment