चंदगड नगरपंचायतीसाठी स्थानिकांसह सर्वपक्षीयांच्या योगदानामुळे यश - चंदगड लाईव्ह न्युज

04 January 2019

चंदगड नगरपंचायतीसाठी स्थानिकांसह सर्वपक्षीयांच्या योगदानामुळे यश


चंदगड ग्रामपंचायत इमारत. 
अनिल धुपदाळे / चंदगड
चंदगडला नगरपंचायत व्हावी यासाठी चंदगडचे सर्वपक्षीय नागरिकांच्या वाढत्या लढ्यामुळे यश मिळाल्याच्या प्रतिक्राया व्यक्त केल्या जात आहेत. तब्बल चार वेळा ग्रामपंचायतीची निवडणुक लावण्यात आली. मात्र चंदगडवासीयांच्या निर्धारामुळे बहिष्कार कायम ठेवत इतिहास घडवण्यात आला. केवळ ऐकीच्या जोरामुळे शासनाला उशिरा का असेना निर्णय घ्यावाच लागला.
चंदगड नगरपंचायतीसाठी चंदगड नगरपंचायतीसाठी शासनदरबारी चंदगडवासीयांनी प्रयत्नांची शिकस्त सुरूच ठेवली. याकामी अखेरच्या सत्रात भाजपच युवा कार्यकर्त्यांनी सातत्याने मंत्रालयाचा संपर्क ठेवला. याकामी सुरूवातीला एक वर्षापुर्वी शहरवासियांनी सर्वपक्षीयांची कृती समिती स्थापन करून नगरपंचायतीसाठी प्रयत्नांची शिकस्त सुरू केली. बंद, आंदोलन, साखळी उपोषण, निवेदन, मंत्रालयात भेटी ईत्यादीनी प्रयत्नांची पराकष्ठा नेहमी सातत्य ठेवत चंदगड नगरपंचायतीसाठीचा प्रश्न जिवंत ठेवुन आशा पल्लवीत ठेवल्या. नगरपंचायतीसाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार संध्यादेवी कुपेकर, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडीक, विधानपरिषद विरोधी पक्ष नेते सतेज उर्फ बंटी पाटील, माजी राज्यमंत्री भरमुआण्णा पाटील, तालुका संघाचे चेअरमन राजेश पाटील, नगरपंचायत कृती समिती प्रमुख शिवानंद हुंबरवाडी, जि. प. सदस्य सचिन बल्लळ, पं. स. सभापती बबन देसाई, पं. स. सदस्य दयानंद काणेकर, माजी सरपंच अरूण पिळणकर, माजी जि. प. सदस्य, बाबूराव हळदणकर, माजी पं. स. सभापती शांताराम पाटील, अमिर मुल्ला, माजी जि. प. माजी सदस्य राजेंद्र परिट, अल्ली मुल्ला, शिवसेना जिल्हा उपप्रमुख प्रभाकर खांडेकर, विधानसभा संघटक संग्राम कुपेकर, संपर्क प्रमुख प्रा. सुनिल शिंत्रे, महिला आघाडीच्या सौ. शांता जाधव, सौ संज्योती मळवीकर, तालुका अध्यक्ष अनिल दळवी, ॲड. संतोष मळवीकर, तसेच भाजप कार्यकारणी सदस्य गोपाळराव  पाटील, भाजपचे आजराचे नेते रमेशराव रेडेकर, चंदगडचे युवा उद्योजक सुनिल काणेकर, तालुका अध्यक्ष नामदेव पाटील, भाजपा युवा जिल्हा उपाध्यक्ष समीर पिळणकर, चंद्रकांत दाणी, रविंद्र कसबल्ले, संदिप नांदवडेकर, तजमुल फणीबंद, मारूती पावसकर, सुधीर मोरे, गणपत कोलकार, प्रमोद कांबळे ईत्यादीसह अनेकानी वेळोवेळी सकारात्मक दृष्ट्या योगदान देत चंदगडच्या नगरपंचायीतसाठी प्रयत्नांची शिकस्त सुरूच ठेवली. सेवा निवृत कर्मचारी संघटना, अनेक सामाजीक, राजकीय संघटना, ईत्यादीनी पाठबळ दिले. सर्वच थरातील वाढत्या मागणींचा विचार तसेच भविष्यातील ऱाजकिय विचार लक्षात घेता अखेर थोड्या उशिरा का असेना चंदगडवासीयांनी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त होत आहे.
अनिल धुपदाळे, चंदगड
  


No comments:

Post a Comment