चंदगड तालुका पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी नंदकुमार ढेरे, उपाध्यक्षपदी श्रीकांत पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

06 January 2019

चंदगड तालुका पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी नंदकुमार ढेरे, उपाध्यक्षपदी श्रीकांत पाटील

नंदकुमार ढेरे                              श्रीकांत पाटील

चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी नंदकुमार ढेरे तर उपाध्यक्षपदी श्रीकांत पाटील याची एकमताने निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी तालुका अध्यक्ष संजय पाटील होते. प्रास्ताविक संपत पाटील यांनी केले. यावेळी सचिवपदी चंद्रशेखर तारळी, खजिनदारपदी चेतन शेरेगार तर संपर्कप्रमुख म्हणुन संतोष सुतार यांची निवड करण्यात आली.
यावेळी कोल्हापुर डिस्ट्रिक रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशनचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल धुपदाळे यांनी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जाभेंकर याच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी ते म्हणाले, "समाजाच रक्षण करण्याची जबाबदारी पत्रकार प्रामाणिकपणे पार पाडत असतो. पत्रकाराकडे समाजाचा बघणयाया दृष्टीकोन सकारात्मक असतो." यावेळी राजेंद्र शिवणगेकर, नंदकुमार ढेरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी निवृत्ती हारकारे, सजंय पाटील, युवराज पाटील, संपत पाटील, संतोष सावंत-भोसले, रोहीत धुपदाळे उपस्थित होते. सुत्रसचांलन संतोष सुतार यांनी तर आभार संतोष सावंत भोसले यांनी मानले.


No comments:

Post a Comment