चंदगड तालुका पत्रकार संघामार्फत पत्रकार दिन उत्साहात साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

06 January 2019

चंदगड तालुका पत्रकार संघामार्फत पत्रकार दिन उत्साहात साजरा

चंदगड येथे पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना मेजर संजय गावडे व उपस्थित पत्रकार संघाचे पदाधिकारी.
चंदगड / प्रतिनिधी 
कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशन व महाराष्ट्र पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जन्मदिनी पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील होते. यावेळी प्रमुख पाहुणे मेजर संजय गावडे यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्वागत पत्रकार संघटना चंदगड व आजरा संपर्क प्रमुख संतोष सुतार यांनी केले. प्रास्ताविक जिल्हा उपाध्यक्ष अनिल धुपदाळे यांनी केले .यावेळी महाराष्ट्र टाइम्स चंदगड प्रतिनिधी संपत पाटील यांना जिल्हा आदर्श पत्रकार पुरस्कार, सुनील कोंडुसकर यांना जि. प. कोल्हापूरचा आचार्य अत्रे आदर्श पत्रकार पुरस्कार तसेच दैनिक सह्याद्री दर्पणचे संपादक संतोष सावंत भोसले यांना तालुकास्तरावरील आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल गौरव करण्यात आला. यावेळी मेजर संजय गावडे म्हणाले ``आम्ही देशाच्या सीमेवर देशवासीयांचे रक्षण करत असलो तरी आमच्या इतकीच महत्वाची जबाबदारी लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेले पत्रकार समाजाची सेवा अहोरात्र करत असतात. पत्रकारांच्या जागृतीमुळेच समाज निकोप राहण्यासाठी मदत होते.``
यावेळी संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी सन 2019 यासाठी नवी कार्यकारणी जाहीर केली. यावेळी यावेळी नंदकुमार ढेरे, श्रीकांत पाटील, निवृत्ती हरकारे, संजय म. पाटील, चंद्रशेखर तारळी, शानुर मुल्ल, युवराज पाटील, राजेंद्र शिवनगेकर, चेतन शेरेगार, अशोक पाटील, राहुल पाटील, बाबासाहेब मुल्ला, रोहित धुपदाळे  उपस्थित होते. आभार संपत पाटील यांनी मानले. 
कोल्हापूर डिस्ट्रीक्ट रिपोटर्स वेलफेअर असोशिएशनच्या वतीने आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पत्रकार दिनी मटाचे संपत पाटील यांचा सत्कार करताना नंदकुमार ढेरे व पदाधिकारी. 

No comments:

Post a Comment