आयुब दस्तगीर मुल्ला |
कालकुंद्री
/ प्रतिनिधी
चंदगड
एसटी आगारातील बस चालक आयुब दस्तगीर मुल्ला (रा. कोवाड, ता. चंदगड) यांची सहायक वाहतूक निरीक्षक पदी नुकतीच पदोन्नती झाली. चंदगड
आगारात चालक म्हणून सलग २० वर्षे विनाअपघात सेवा बजावलेल्या मुल्ला यांनी राज्य
परिवहन महामंडळ कोल्हापूर विभागाच्या वतीने डिसेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या लेखी
परीक्षेत हे यश मिळविले. एसटी कामगार संघटना पदाधिकारी व बस चालक म्हणून
लोकाभिमुख सेवेमुळे ते तालुक्यातील प्रवासी वर्गात ते लोकप्रिय आहेत. पदोन्नती
बद्दल त्यांचे एसटी प्रवासी वर्गातून तसेच चंदगड तालुक्यातून अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment