कोवाड महाविद्यालयात मन भरारी काव्यसंग्रहाचे प्रकाशन - चंदगड लाईव्ह न्युज

03 January 2019

कोवाड महाविद्यालयात मन भरारी काव्यसंग्रहाचे प्रकाशन

कोवाड (ता. चंदगड) येथील महाविद्यालयात मोहन गावडे यांच्या मनभरारी काव्यसंग्रहाचे प्रकाशन करताना मान्यवर.  
कोवाड / प्रतिनिधी
कोवाड (ता. चंदगड) येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात मोहन गावडे यांच्या मनभरारी काव्यसंग्रहाचे प्रकाशन  झाले. अध्यक्षस्थानी संस्था सचिव एम. व्ही. पाटील होते.  रोपाला पाणी घालून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
पाहुण्यांचा परिचय व प्रास्ताविक डॉ. एस. एन. कांबळे तर स्वागत प्रा. एस जे. पाटील यांनी केले. महाविद्यालयाच्या वतीने मोहन गावडे यांचा शाल व श्रीफळ  देवून प्राचार्य डॉ. आर. एस. निळपणकर यांचे हस्ते सन्मान करण्यात आला. सागर मोरे, डॉ. आर. एस.  निळपणकर व कवी मोहन गावडे यांची मनोगते झाली. प्रमुख मार्गदर्शन डॉ. एस. एम. पाटील यांनी काव्यसंग्रहाचे परीक्षण करताना म्हणाले की, ``मोहन गावडे यांची कविता ग्रामसंस्कृतीचा अस्सल बाज जपणारी. लोकजीवनातील सारे संदर्भ देत जीवनमूल्य, समाजकारण, राजकारण, बेकारी, व्यसनाधिनता, आणि सृष्टीसौंदर्य अचूक मांडते  आहे आणि हे सारं अस्सल चंदगडी बोलीभाषेतून व्यक्त होते... म्हणून कवी हा सृष्टीसौंदर्याबाबत जागरूक दिसतो..त्यांचा जीवन संघर्षही  त्यांच्या अनेक कवितेतून प्रकर्षाने जाणवतो.``अध्यक्षीय भाषणात श्री. पाटील म्हणाले यांनी कविता साहित्य परंपरा व यांचा वारसा रणजित देसाईनी जपला त्यामुळे विद्यार्थ्यांनीही लेखन करून भागाचं नाव व कार्य कराव. हेच वय चांगलं लेखन कार्य करण्याच आणि शिकायचं आहे. सुत्रसंचालन प्रा. डॉ. आर. डी. कांबळे यांनी केले व आभार डॉ. एस. बी. पाटील यांनी मानले. या प्रकाशन सोहळ्याला कला, वाणिज्य विज्ञान व बीसीए या सर्व विभागांचे प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी सेवक उपस्थित होते.


1 comment:

Post a Comment