![]() |
आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर |
चंदगडची ग्रामपंचायत निवडणुक लागल्यानंतर चंदगडच्या जनतेने जोपर्यंत चंदगड नगरपंचायत होत नाही तोपर्यंत ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकायचा निर्णय घेतला. याबाबत चंदगड ग्रामस्थांनी चार वेळा ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकून आपला विरोध प्रकर्षाने दर्शविला होता. आज चंदगड ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळाला. त्यामुळे नगरपंचायत हा चंदगडवासीयांच्या एकीचा विजय आहे असे प्रतिक्रिया चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर यांनी चंदगड लाईव्ह न्युजला दिली.
चंदगड नगरपंचायतीच्या मागणीला पाठिंबा देत 29 जुन 2017 ते आजतागायत आठ वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेतली. वेळोवेळी पत्रव्यवहार करून चंदगडच्या जनतेच्या भावनेची कल्पना दिली.
याचबरोबर 6 मार्च 2018 रोजी चंदगडच्या संपुर्ण शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. चंदगड नगरपंचायत होणेसाठी तीन वेळा तारांकित प्रश्न उपस्थित करून सभागृहात लक्ष वेधले. अलिकडेच हिवाळी अधिवेशनात 26 नोव्हेंबर 2018 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात भेट घेवुन प्रलंबित चंदगड नगरपंचायतीचा निर्णय लवकर घेण्याबाबत आग्रही भुमिका घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर चंदगड नगरपंचायतीसाठी तात्काळ प्रस्ताव सादर करणेत यावा. असा आदेश नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव मा मनिषा म्हैसकर-पाटणकर यांना दिला. त्यानंतर म्हैसेकर यांची देखील भेट घेवुन चंदगड नगरपंचायत होणेसाठी प्रस्ताव ताबडतोब देण्यासंदर्भात चर्चा केली. या सर्वांचा विचार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंदगड नगरपंचायतीस मान्यता दिली. त्याबद्दल चंदगड शहरवासीयांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानते. चार वेळा निवडणुकीवर बहिष्कार टाकुन चंदगडवासीयांनी दाखविलेल्या एकीचा हा विजय असुन मी चंदगडवासीयांचेही अभिनंदन करत असल्याचे आमदार श्रीमती कुपेकर यांनी चंदगड लाईव्ह न्युजशी बोलताना
No comments:
Post a Comment