मांडेदुर्ग ग्रामसेवक यांच्यावर कारवाईची ग्रामस्थांची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

17 January 2019

मांडेदुर्ग ग्रामसेवक यांच्यावर कारवाईची ग्रामस्थांची मागणी

चंदगड / प्रतिनिधी
मौजे मांडेदुर्ग (ता. चंदगड) येथील ग्रामसेवक तातोबा गिरी कित्येक दिवसापासून ग्रामपंचायतीमध्ये हजर नाहीत. त्याच्याबाबत वारंवार तक्रार होऊनही ते ग्रामपंचायतीमध्ये हजर होत नाहीत.  यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना लागणारे नाहरकत  दाखले, मराठा जातीचा दाखला काढण्यासाठी लागणारे दाखले, मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे गटविकास अधिकारी आर. बी. जोशी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी याची वेळीच दखल घेऊन या ग्रामसेवकावर कारवाई करुन त्वरित दुसरा ग्रामसेवक नेमून करावा. नागरीकांची होणारी अडचण दुर करावी अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. याबाबतची निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी यांना दिले आहे. 

No comments:

Post a Comment