बसर्गे येथे भरमूआण्णांच्या वाढदिनी रक्तदान शिबीराचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

16 January 2019

बसर्गे येथे भरमूआण्णांच्या वाढदिनी रक्तदान शिबीराचे आयोजन

भरमुआण्णा सुबराव पाटील
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्याच्या हरित व धवल क्रांतीचे प्रणेते, गोरगरिबाचे कैवारी माजी राज्यमंत्री भरमुआण्णा सुबराव पाटील यांचा  84 वा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. या  निमीत्त मौजे बसर्गे (ता. चंदगड) येथे गुरुवारी 17 जानेवारी 2019 रोजी सकाळी 10 वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. साधेपणाने होणाऱ्या कार्यक्रमात भरमुआण्णा हे घरीच शुभेच्छा स्विकारणार आहेत. त्यामूळे कार्यकत्यानी शुभेच्छा देण्यासाठी बसर्गे येथे उपस्थित रहावे असे आवाहन शामराव बेनके यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment