वस्त्रोद्योगाच्या धर्तीवर काजू प्रक्रिया उद्योगासाठी नवीन धोरण जाहीर करणार- अर्थमंत्री सुधिर मुनगंटीवार - चंदगड लाईव्ह न्युज

10 January 2019

वस्त्रोद्योगाच्या धर्तीवर काजू प्रक्रिया उद्योगासाठी नवीन धोरण जाहीर करणार- अर्थमंत्री सुधिर मुनगंटीवार

काजू उद्योगासंदर्भात विविध मागण्यांचे निवेदन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना देताना सिंधूदूर्गकोल्हापूर व रत्नागिरी परिसरातील काजू उद्योजक. 

काजू उद्योजकांच्या मागण्यांना अर्थमंत्र्यांचा हिरवा कंदील
अपारंपरिक ऊर्जा स्रोतासाठी मा. ऊर्जामंत्री बावनकुळे अनुकूल
नंदकुमार ढेरे / चंदगड
      आजारी आवस्थेत सक्रंमण करत असलेल्या काजू उद्योगाला सरकारी मदत मिळून उर्जितावस्था प्राप्त व्हावी यासाठी आज सिंधूदूर्गकोल्हापूर व रत्नागिरी मधील काजू उद्योजकानी अर्थमंत्री सुधीर मनगुंटीवार व ऊर्जा व उत्पादन शूल्क मंत्री चंद्रकांत बावनकूळे यांची भेट घेतली. यावेळी काजू ऊद्योजकानी काजू व्यवसायत निर्माण झालेल्या अडचणीचा पाढाच वाचला.
       या बैठकीत अर्थमंत्री सूधीर मगूंटीवार यांनी  काजू व्यवसायातील  विविध समस्या समजून घेऊन, पुन्हा एकदा बळकटी देण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांवर चर्चा केली. त्याच प्रमाणे रत्नागिरी, सिंधूदूर्ग व  कोल्हापूर येथे जाऊन काजू व्यावसायिकांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. आज या सर्व समस्यां शासन दरबारी मांडून ठोस उपाय योजना करण्याकरिता काजू पिक समिती सदस्यांसह, शेतकरी, व्यावसायिक यांच्या शिष्टमंडळाशी यावेळी झालेल्या सांगोपांग चर्चेअंती काजू प्रक्रिया उद्योगासाठी प्रोत्साहन योजनेतून 6% व्याज परतावा (६% इंटरेस्ट सबसिडी) देण्यास तत्त्वतः मान्यता देण्यात आली. काजू उद्योगाच्या मूल्य वर्धित कर (VAT) परातव्यापैकी २०१० पासूनची शासनाकडे प्रलंबित असलेली १५% रक्कम आठ दिवसात वितरित करण्याचे आदेश अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी संबंधित विभागाला दिले. काजू प्रक्रिया उद्योगांनी त्यांना आवश्यक असणारी विजेची गरज अपारंपरिक स्रोताद्वारे म्हणजे सोलर प्रकल्प उभारून पूर्ण केल्यास सोलर प्रकल्पासाठी तब्बल ५०% अनुदान देण्यात येईल, अशी ग्वाही मुनगंटीवार यांनी दिली. काजू बोंडापासून इथेनॉल व सीएनजी निर्मितीचा पथदर्शी प्रकल्प उभारण्यासाठी येत्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्याचे आश्वासन दिले. जेणेकरून भविष्यात या  बाय-प्रोडक्ट मधून अर्थार्जन देखील होऊ शकेल. काजू प्रक्रिया उद्योगासाठी वस्त्रोद्योग धोरणाच्या धर्तीवर नवीन धोरण तयार करण्याबाबत मुख्य सचिवांना निर्देश देण्यात आले. या बैठकीवेळी ऊर्जा व उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोलर प्रकल्प उभारणीसाठी अनुदान व इथेनॉल आणि सीएनजी निर्मिती प्रकल्पासाठी आवश्यक ती मान्यता देण्यास तात्काळ सहमती दर्शविली.
        अतुल काळसेकर यांच्या नेतृत्वाखाली आणि भाजपा युवा नेते संदेशजी पारकर, कोल्हापूर कॅशु मॅनुफॅक्चरर अँड ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष मोहन परब, शामराव बेनके, प्रदेश कार्यालय सहसचिव शरद चव्हाण, भाजपा जिल्हाउपाध्यक्ष राजन चिके, काजू पिक समिती सदस्य अमित आवटे, मंदार कल्याणकरसावंतवाडी पं स सदस्य संदीप गावडे, भाजपा जिल्हा चिटणीस तथा काजू उत्पादक शेतकरी साई नाईक आणि वेंगुर्ला शहरातील काजू कारखानदार दिपक माडकर, दादू कविटकर, अभिषेक चव्हाण, काजू उद्योजक अनिरुद्ध गावकर, रत्नागिरी जिल्ह्यातील हरिष कांबळे, राजश्रीताई  विश्वासराव, धनंजय यादव उपस्थित होते.
नंदकुमार ढेरे, चंदगड प्रतिनिधी


No comments:

Post a Comment