![]() |
कोवाड येथील महावितरणच्या अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देताना शेतकरी वर्ग. |
कोवाड /
प्रतिनिधी
कृषीपंपांचा
रात्रीचा विजपुरवठा खंडीत करून दिवसा वीजपुरवठा सुरू करावा, या
मागणीसाठी आज कोवाड परिसरातील शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी
उपकार्यकारी अभियंता डी. एम. पाटणकर यांनी शेतकऱ्यांची मागणी वरिष्ठांना
कळविण्याचे आश्वासन देऊन शेतकऱ्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. पण संतप्त
झालेल्या शेतकऱ्यांनी महावितरणच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करुन रविवार पर्यंत
वीज पुरवठ्याच्या वेळेत बदल केला नाही तर सोमवार (ता. १४) रोजी वीज कंपनीच्या
कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेऊन शेतकरी माघारी फिरले. स्वाभिमानी शेतकरी
संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रा. दिपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी
महावितरणला मागण्यांचे निवेदन दिले.
महावितरणने
रात्रीच्यावेळी सुरु केलेला विज पुरवठा शेतकऱ्यांना त्रासदायक असल्याने शेतकऱ्यांनी दिवसा
वीज पुरवठा सुरु करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली. प्रा.
दिपक पाटील यांनी महावितरणच्या अनागोंदी कारभाराबद्दल पाटणकर यांना धारेवर धरले. कोवाड
उपकेंद्राचा कारभार हा मनमानी सुरू असल्याने शेतकऱ्यांना त्याचा त्रास होत
असल्याचे सांगून वरिष्ठांनी दखल घेतली नाही तर जनआंदोलन उभे करु असा इशारा दिला. उपकार्यकारी
अभियंता पाटणकर यांनी वरिष्ठांना अहवाल पाठवून शेतकऱ्यांची भावना कळविण्याचे
सांगितले. शिवाजी पाटील यांनी वीज कंपनीचे कर्मचारी वेळेवर कामावर हजर नसतात. या
कर्मचाऱ्यांच्यावर अंकुश ठेवणार की नाही असा प्रश्न केला. कागणीचे माजी उपसरपंच
जनार्दन देसाई यांनी कनिष्ठ अभियंता मयूर पिसे यांची तात्काळ बदली करावी, अशी मागणी
केली. वाकलेले खांब व लोंबकळणाच्या विद्युत वाहिनींचा प्रश्न गहन झाल्याचे संजय
कुटे यांनी सांगितले. चंद्रकांत कांबळे यांनी कुदनूर गावाला वायरमन नसल्याची
तक्रार केली. नेमणूकीच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याची प्रकाश पुजारी
यांनी मागणी केली. यावेळी वसंत जोशिलकर, वसंत सुतार, नरसिंग
बाचूळकर, विवेक मनगुतकर, कृष्णकांत
साळुखे, शिवाजी पाटील, श्री. किणेकर, सचिन
पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment