कोवाड येथे सन 1983-84 च्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळावा संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

10 January 2019

कोवाड येथे सन 1983-84 च्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळावा संपन्न

कोवाड येथे आयोजित माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्या प्रसंगी बोलताना अशोकराव देसाई उपाध्यक्ष,किणी कर्यात शिक्षण संस्था, कोवाड़ व इतर मान्यवर

कोवाड / प्रतिनिधी
येथील श्री राम विद्यालयाच्या सन 1983-84  दहावी च्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळावा अशोकराव देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. प्रमुख एम. व्ही. पाटील, बी. आर. पाटील, श्री. सरवणकर, मस्करेज, अरविंद कुंभार, सौ. सावनूर, मनोहर भोगन, शिवाजी बागड़ी यांची उपस्थिती होती.
प्रारंभी पत्रकार दिनानिमित्त उपस्थित चंदगड़ तालुका पत्रकार संघाचे सदस्य संजय पाटील, श्रीकांत पाटील व संजय कुंभार यांचा शाल श्रीफळ, सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सुहास दद्दीकर यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचे स्वागत संजय गडकरी यांनी केले. यावेळी नागोजी पाटील, सुबराव बिर्जे, सुरेश वांद्रे, अर्जुन वांद्रे, वसंत वांद्रे, अरुण सर्वे आदी सह माजी विद्यार्थ्यांची मनोगतातून जुन्या शालेय आठवणीना उजाळा दिला. जुन्या आठवनींना उजाळा मिळाल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर वेगळा आनंद दिसत होता. याप्रसंगी भाजपा चंदगड़ तालुका युवा मोर्चाचे उपाध्यक्ष सुरेश वांद्रे यांनी 5 ते 10 वी मधील गरीब तसेच होतकरु असलेल्या एका विद्यार्थ्यचा शैक्षणिक खर्च उचलन्याचा मनोदय व्यक्त केला. सूत्रसंचालन सदानंद पाटील यांनी केले. मान्यवरांचे आभार पांडुरंग कांबळे यांनी मानले.
कोवाड येथील श्रीराम विघालय येथे कोवाडच्या सन 1984 -85 बॅचच्या स्नेह मेळाव्याला जमलेले माजी विद्यार्थ्यी व शिक्षक


No comments:

Post a Comment