![]() |
दुंडगे येथे विशेष श्रमसंस्कार शिबीरात मार्गदर्शन करताना जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. डी. जी. चिघळीकर व इतर मान्यवर. |
कोवाड / प्रतिनिधी
कोवाड कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कोवाड येथील एन. एस. एस. चे शिबिराचे पहिले पुष्प गुंफण्यासाठी जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. डी. जी. चिघळीकर यांचे `ग्रामविकासात ग्रामस्थांचे योगदान` याविषयी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी जोतीबा दतू कोकितकर होते.
डॉ. चिघळीकर म्हणाले, ``आजच्या समाजासाठी बलिदान करणारे सारे राष्ट्रपुरुष हे समाज विकासाला चालना देणारे आहेत. महात्मा गांधी, पंडित नेहरु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सारखे महान राष्ट्र घडविण्याचे स्वप्न बाळगून समाज घडवता येतो, यासाठी अहोरात्र झटले. अनेक योजना व मूलभूत सुविधापासून दूर असल्यामुळे समाजस्वास्थ बिघडते. समाज, राष्ट्र, देश विकासासाठी प्रयत्न करायचाच झाला तर नवनव्या योजनाचा अभ्यास करून नवनव्या योजना गावात आणण गरजेच आहे. म्हणून ग्रामविकासाला चालना देणेसाठी ग्रामवासियांनी रोजगार निर्माण करावीत.`` अध्यक्षीय मनोगत जोतीबा कोकीतकर यांनी तर राजेंद्र पाटील, दयानंद पाटील यांची मार्गदर्शन पर मनोगते व्यक्त केली. यावेळी नारायण गवेकर, रविंद्र गवेकर, पुंडलिक सुतार, दमानंद पाटील, मारूती पाटील, यशवंत पाथरुट, संतोष सुतार, मारूती पाटील, नामदेव कोकितकर, महादेव बोंद्रे, विष्णु पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन कला गटाने केले होते. प्रास्ताविक व ओळख प्रियंका कांबळे यांनी तर सूत्रसंचालन ऋतुजा पाटील व आभार वैभव पाटील यांनी मानले.
No comments:
Post a Comment