अडकूर येथे सर्धा परिक्षा मार्गदर्शन करताना कमलेश जाधव |
अडकूर /
प्रतिनिधी
आजकालच्या
जीवनात दहावी पास झाल्यानंतर विद्यार्थी व विद्यार्थिंनीना काय करावे याचा प्रश्न
निर्माण होतो. जर आपल्या भावी जीवणात स्थिरता आणायची असेल तर सर्वप्रथम स्वतःचे
आत्मपरीक्षण करावे व कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे ते निवडावे असे प्रतिपादन
यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णीचे राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी प्रतिनिधी
कमलेश जाधव यांनी व्यक्त केले. शिवशक्ती हायस्कूल व ज्युनिअर महाविद्यालय अडकुर (ता.
चंदगड) येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन या विषयावर
ते बोलत होते.
प्रास्ताविक
प्रकल्प अधिकारी एम. पी. पाटील यांनी केले. राजर्षी शाहु विचार व प्रचार परीक्षा
तसेच सैनिकी सेवा पूर्व शिक्षण संस्था औंरगाबाद, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी पुणे, सैन्यदल
व पोलिसदल तसेच युपीएससी ते तलाठी अभ्यास कशाप्रकारे करावा, कोण कोणती पुस्तके वाचावी याची यादी कालकुंद्री
गावचे विजयश्री फौंडेशनचे प्रा. जॉर्ज क्रुझ यांनी लिहीलेले पोस्ट काढायची गोष्ट
या पुस्तकाबद्द्ल व शासनाचे मुखपत्र लोकराज्य, महाराष्ट्र वार्षिकी अंक या
पुस्तकाबद्द्ल सविस्तर मार्गदर्शन कमलेश जाधव यांनी केले. यावेळी प्राचार्य डी. जी.
कांबळे यानीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला हणमंत देसाई, रमेश पाटील, सौ सुजाता इंगवले यांच्यासह विद्यार्थी
व विद्यार्थिनी उपस्थिती होत्या. सूत्रसंचालन आर. व्ही. देसाई यांनी केले तर आभार
एस. के. हरेर यांनी मानले.
No comments:
Post a Comment