मांडेदुर्ग प्राथमिक शाळा समूहगीत स्पर्धेत जिल्ह्यात दुसरी - चंदगड लाईव्ह न्युज

17 January 2019

मांडेदुर्ग प्राथमिक शाळा समूहगीत स्पर्धेत जिल्ह्यात दुसरी

समूहगीत स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावलेले मांडेदुर्ग प्राथमिक शाळेचे विद्यार्थी व विद्यार्थ्यींनी. 
चंदगड / प्रतिनिधी
जिल्हा परीषद कोल्हापूर यांचेमार्फत आज घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धा-2019  यातील समूहगीत स्पर्धेत कुमार विद्यामंदीर मांडेदुर्ग (ता. चंदगड) येथील प्राथमिक शाळेने जिल्ह्य़ात दुसरा क्रमांक पटकावला. चंदगड तालुक्यामधुन जवळ 300 शाळेमधून कुमार विद्यामंदीर मांडेदुर्ग या शाळेची जिल्हास्तरीयसाठी निवड झाली होती. शाहु स्मारकमध्ये झालेल्या या स्पर्धेत अतिशय सुरेल आवाजात गायन करून समूहगीतमध्ये जिल्ह्य़ात  दुसरा क्रमांक पटकावला. गेल्या वर्षीही या शाळेने दुसरा क्रमांक पटकावला होता. त्यामुळे सर्व विद्यार्थी, शिक्षक व वाद्यवृंद टिम यांचे अभिनंदन होत आहे.  यामध्ये ऋतुराज पाटील, विक्रांत दळवी,  शुभम सुतार,  प्रथमेश सुतार,  आर्या मुरकुटे, हर्षदा पाटील,  नताशा पाटील,  मधुराणी चौथे, विजया धामणेकर,  वैष्णवी धामणेकर,  संजीवनी धामणेकर,  वैष्णवी पाटील,  तेजस्विनी पवार, प्रांजल पाटील या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.  यासाठी केंद्रप्रमुख विलास कांबळे, मुख्याध्यापक एम. डी. नाईक, रमेश हुद्दार, प्रकाश बोकडे, रोहीदास पाटील,आशा पाटील, रघुनाथ पाटील या शिक्षकांचे आणि शालेय कमिटी अध्यक्ष भरमाण्णा पाटील व उपाध्यक्ष मधुरा पाटील यांचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment