अडकूर / प्रतिनिधी
इयत्ता आठवीची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (pss ) नागनवाडी (ता. चंदगड) येथील केंद्रावर अत्यंत कडक व सुरळीत पार पडली. या केंद्रावर 161 विद्यार्था प्रविष्ठ होते. यावेळी प्रथमच उत्तरपत्रिकेवर परिक्षार्थिचा बैठक क्रमांक, केंद्र क्रमांक व माध्यम छापलेले होते. त्याचबरोबर या उत्तरपत्रिका कार्बनलेस पुरविण्यात आल्या होत्या. प्रत्येक उत्तर पत्रिकेवर OMR नंबर देण्यात आला होता. अत्यंत कडक शिस्तित परिक्षार्थिनी परीक्षा दिली. केंद्रसंचालक म्हणून आजऱ्याचे बळवंत लोंढे यांनी काम पाहिले तर पर्यवेक्षक मणून एन. के. निर्मळकर, एस. जे. पाटील, एस. के. पाटील, एस. जे. शिंदे, एन. एस. गावडे, एम. बी. पाटील, आर. व्ही. शिवनगेकर यांनी काम पाहिले.
No comments:
Post a Comment