बाळाराम नाईक |
अडकूर / प्रतिनिधी
गणूचीवाडी (ता. चंदगड) येथील मराठी विद्यामंदिरचे अध्यापक बाळाराम नाईक यांना आदर्श शिक्षक गुरुदेव पुरस्कार 2019 जाहिर झाला आहे. सर्वोदय शिक्षण संस्था गगनबावडा व गॅलक्सि फौंडेशन इंचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने विविध स्पर्धा परीक्षामध्ये यशस्वी व तज्ञ मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना हा पुरस्कार देण्यात येतो. गणूचीवाडी विद्यामंदिरचे अध्यापक श्री. नाईक यांनीही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगतीसाठी उल्लेखनिय कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात येत असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पुरस्काराबद्दल बाळाराम नाईक यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
No comments:
Post a Comment