न्यू हायस्कूल अलबादेवी येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप - चंदगड लाईव्ह न्युज

28 February 2019

न्यू हायस्कूल अलबादेवी येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप


अडकूर / प्रतिनिधी
न्यू हायस्कूल अलबादेवी  (ता. चंदगड) येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा व पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. शिक्षिका श्रीमती जे. एम. हुक्केरी प्रमुख उपस्थिती होत्या. त्यांना कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघाचा 'प्रेरणा' पुरस्कार प्राप्त झालेबद्दल  सत्कार करणेत आला. प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. बागे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष  दिनकर कोले, संस्थेचे अध्यक्ष बी. आर. दळवी, वर्गशिक्षक व्ही. एस. कोले यांनी विध्यार्थांना शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुणे श्रीमती जे. एम. हुक्केरी यांनी विदयार्थांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी  रघुनाथ कोले, प्राथमिक शिक्षक पोपट गायकवाड, सौ.  बागडी, पालक, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सुत्रसंचालन टी. जी. बोकडे यांनी केले तर आभार यू. के. भिंगुडे यांनी मानले.


No comments:

Post a Comment