कोवाड (ता. चंदगड) येथे आयोजित हळदी कुंकू व महिला मेळाव्यावेळी बोलताना भागिरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक व समोर उपस्थित बहुसंख्य महिलावर्ग. |
ग्रामीण भागातील
महिला आपल्या कर्तृत्वाचा जोरावर सक्षम झाली पाहिजे. तिला तिच्या हक्काची जाणीव
करुन देण्यासाठी भागिरथी महिला संस्थेच्या वतीने प्रशिक्षित दिले जाईल, यातून ती
आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी ती कुठेही कमी पडणार नाही असे मत भागिरथी महिला
संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी व्यक्त केले. कोवाड (ता. चंदगड) येथे
आयोजित हळदी कुंकू व महिला मेळाव्याच्या निमित्त त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी
चंदगड तालुका भागिरथी महिला संस्थेच्या मोहिनी पाटील होत्या.
धनंजय महाडिक युवा
शक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्था कोवाड यांच्या वतीने चंदगड तालुक्यातील कोवाड
येथे हळदी कुंकू समारंभ व महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला
राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष एम. जे. पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सौ.
अरुंधती महाडिक म्हणाल्या, ``भागिरथी महिला
संस्थेच्या वतीने पावणे दोन लाख महिलांना व्यवसाय प्रशिक्षण देऊन सक्षम केले आहे.
निराधार ,विधवा महिलांना शेळी मेंढी पालन व्यवसाय देऊन कुटुंबाला हातभार
लावला आहे. या विधायक कामासाठी संसदरत्न खासदार धनंजय महाडिक आपल्या संस्थेच्या
पाठिशी खंबीर पणे साथ देत राहिले. चांगल्या माणसाला आज आपल्या आशिर्वादाची
आवश्यकता असून, आगामी लोकसभा निवडणुकीत त्याचे हात अधिक बळकट करुया. महिला
सक्षमीकरणासाठी भागीरथी महिला संस्थेचे कार्य गावागावात पोहचवूया असे आवाहन केले.``
यावेळी संसदरत्न
खासदार धनंजय महाडिक म्हणाले ``प्रचंड मोठी मोदी लाट असताना सन 2014 मध्ये असताना आपण विश्वासाने संसदेत
पाठवला. कोल्हापूर जिल्ह्यातील जनेतच्या प्रश्नांचा अभ्यास केला व 1155 प्रश्न उपस्थित
केले. विरोधी बाकावर असताना सुध्दा अनेक दिग्गजासमोर महिला चे प्रश्न उपस्थित
केले.27 राज्यापैकी 20
राज्यांत सँनटरी नँपकीन शाळा काँलेज
मध्ये मोफत पुरवठा केला जातो. यासाठी सर्व प्रथम प्रयत्न केले. महिलासाठी स्वतंत्र
वाचनालयचा प्रश्न आपण उपस्थित करुन. महिलाच्या अनेक रोजगाराच्या सुविधा उपलब्ध
करुन घेतल्या. स्त्रियांना त्यांच्या हक्काची जाणीव
झाली पाहिजे यासाठी आपण सदैव कार्यतत्पर राहणार असून आगामी लोकसभा निवडणुकीच्या
निमित्ताने तुमच्या समोर येणाऱ्या उमेदवारांचे कर्तृत्व तपासा.खासदारकी वारसा
हक्काने मागण्यांसाठी ती काय बापजाद्यांची मालमत्ता नाही हे दाखवून द्या. महिला कडे प्रचंड ताकद असते या ताकदीने त्या आपल्याला येत्या
लोकसभेसाठी नक्की अशिर्वाद देतील असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. यावेळी
उपस्थित महिलांनी हात उंचावून अशिर्वाद व पाठिंबा दर्शविला.``
माजी राज्यमंत्री
भरमुआण्णा पाटील म्हणाले ``जी चांगली माणसे
असतात ती टिकेकडे दुर्लक्ष करुन आपले काम करतात. त्यांच्या चांगल्या कामाची पोच
त्यांच्या कर्तृत्वात असते. म्हणून तर सलग तिन वेळा संसदरत्न पुरस्काराने सन्मानित
झाले. चांगल्या माणसाच्या सोबत राहणे आपण पसंत करतो. त्यामुळे आगामी लोकसभेत राष्ट्रवादीच्या घड्याळाकडे सर्वांचे लक्ष
असू द्या असे आवाहन त्यांनी यावेळी केले.``
यावेळी गोकुळचे
संचालक रामराजे कुपेकर ,माजी जिल्हा परिषद सदस्या सुजाता पाटील, कोवाडच्या सरपंच
अनिता भोगण ,धनंजय महाडिक युवा आघाडीचे मायाप्पा पाटील ,भागिरथी महिला
संस्थेच्या कार्यकर्त्या प्रिती खोत,इसापूरच्या सरपंच स्वप्नाली गवस यांनी
मनोगते व्यक्त केली. तर राजश्री मोटे यांनी मी सावित्री बोलते हा एकपात्री प्रयोग
सादर करुन उपस्थितांची व्हावा मिळवली.
व्यासपीठावर गोकुळचे संचालक दिपकदादा
पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य बी.डी.पाटील, पंचायत समिती
सदस्या नंदिनी पाटील, गोपाळ ओऊळकर,अजित व्हन्याळकर,
सुजाता आर्दाळकर,मधुआक्का शिंदे, प्रियंका शिंदे, सविता व्हन्याळकर, लीना लोबो, ब्रम्हाकुमारी
शिवालीदिदी,पांडुरंग जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment