अडकूर (ता. चंदगड) येथे दहावीच्या विद्यार्थांच्या निरोप समारंभावेळी मार्गदर्शन करताना प्रा. रामदास बिर्जे. शेजारी इतर शिक्षक. |
एक मार्चपासून चालू होणाऱ्या दहावी बोर्ड परीक्षेसाठी प्रविष्ठ होणाऱ्या श्री शिवशक्ती हायस्कूल अडकूर ता . चंदगड येथील विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डी. जी. कांबळे होते. तर प्रमूख पाहूणे म्हणून प्रा. रामदास बिर्जे उपास्थित होते. स्वागत एस के हरेर यानी केले. यावेळी इयत्ता नववीच्या व दहावीच्या विद्यार्थिनीनी मनोगते व्यक्त केली. पर्यवेक्षक एस. जी. पाटील, आर. पी. पाटील, एस. के. पाटील, एस. डी. पाटील आदिनी शुभेच्छा दिल्या. मन, मेंदू आणि मनगटाच्या जोरावर जीवनात यशस्वी होता येते असे विचार प्रा. बिर्जे यानी व्यक्त केले. प्राचार्य कांबळे यानी परीक्षा पध्दतीची माहिती दिली. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते . आभार आर .व्ही. देसाई यानी मानले .
No comments:
Post a Comment