दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील ओलम ॲग्रो (हेमरस) साखर कारखान्याच्या चालु गळित हंगामाची सांगता दि. ५ मार्च रोजी करण्याचा निर्णय कारखाना व्यवस्थापनाने घेतला असल्याचे ओलम चे बिजनेस हेड श्री. भरत कुंडल यांनी सांगितले.
५ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत कारखाना सुरु राहणार असुन, शेतकऱ्यांनी ऊसाचा वेळेत पुरवठा करुन सहकार्य करावे, असे अवाहन ओलम कारखान्याचे बिजनेस हेड श्री. भरत कुंडल यांनी केले. कारखान्याचा चालु गळीत हंगाम आतापर्यंत १२३ दिवस चालला असुन या कालावधीत ६ लाख २८ हजार मे. टन गाळप झाले आहे. १२.७९ इतका साखरेचा उतारा अस॒ल्याने ७ लाख ९४हजार ९०० क्विटल साखरेचे उत्पादन झाले आहे.
कारखान्याने १५ जानेवारी पर्यंत आलेल्या ऊसाला एफ. आर. पी रु. २९२० प्रति. मे. टन प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर बिले जमा केलेली आहेत तसेच १६ जानेवारी नंतर आलेल्या ऊसाची रक्कम रु. २९२० प्रति. मे. टन प्रमाणे लवकरच शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्यात येईल यांची माहिती श्री. कुडंल यांनी दिली. ऊस उत्पादक शेतकऱ्यानी ओलम व्यवस्थापनावर विश्वास दाखवत जास्तीत जास्त ऊसाचा पुरवठा केल्याने कारखान्याचे नियोजित उद्दिष्ट्पुर्ती केली आहे. याबद्द्ल कारखाना व्यवस्थापनामार्फत सर्व ऊस उत्पादक शेतकरी , तोडणी वाहतुकदार तसेच कारखान्याचे हितचिंतक यांचें आभारी असल्याचे श्री. भरत कुंडल यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment