सरस्वती विद्यालय कालकुंद्री (ता. चंदगड) येथे मराठी राजभाषा दिनाप्रसंगी बोलताना महादेव शिवणगेकर |
दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
"मराठी भाषेतील लिखाणा सोबत वाचनही तितकेच महत्वाचे आहे. देवघराबरोबरच प्रत्येक घरात पुस्तकालय होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने मराठी टिकेल." असे प्रतिपादन अध्यापक संघाचे अध्यक्ष महादेव शिवणगेकर यांनी केले. ते चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या हस्ताक्षर स्पर्धाचे बक्षिस वितरण व मराठी राजभाषा दिनाच्या कार्यक्रमात प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य निर्मळकर होते. प्रमुख पाहूणे म्हणून प्रास्ताविक जी.आर. कांबळे यांनी केले. हा बक्षिस वितरणाचा कार्यकम सरस्वती विद्यालय कालकुंद्री (ता. चंदगड) येथे पार पडला.
यावेळी हस्ताक्षर स्पर्धाचे बक्षिस वितरण मराठी अध्यापक संघाचे पदाधिकारी यांचे हस्ते करण्यात आले. महादेव शिवणगेकर व संजय साबळे यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबददल या वेळी सत्कार करण्यात आला.कुसुमाग्रजांच्या कवितांवर आधारीत ' कुसुमांजली ' हा काव्य गायनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. यामध्ये महादेव शिवणगेकर , बी.एन. पाटील, संजय साबळे, हणमंत पाऊसकर ,एस.पी. पाटील यांनी कुसुमाग्रजाच्या कवितांचे काव्य गायन केले. कार्यक्रमाला हस्ताक्षर स्पर्धेत यशस्वी विद्यार्थी, पालक, शिक्षक उपस्थित होते. इंद्रजीत होणगेकर, सुनिता बोरूगले, अंतोन फर्नाडिस, ई.एल. पाटील. प्रशांत कोकीतकर , मोमीन सर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष बेळगावकर तर आभार एन. जे. बाचूळकर यांनी मानले.
No comments:
Post a Comment