जि.प. सदस्या सुनिता रेडेकर यांच्या हस्ते जिल्हापरिषदेच्या "तारांगणा" पुरस्कारचे वितरण - चंदगड लाईव्ह न्युज

28 February 2019

जि.प. सदस्या सुनिता रेडेकर यांच्या हस्ते जिल्हापरिषदेच्या "तारांगणा" पुरस्कारचे वितरण


आजरा / प्रतिनिधी
महिला व बाल कल्याण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर पुरस्कृत जिल्हास्तरीय "तारांगणा" पुरस्कार सोहळा आज इचलकरंजी येथील प्रकाश उत्तम चित्रमंदिर येथे मोठ्या दिमाखात पार पडला.आजरा तालुक्यातील सौ.विजया शांताराम माने (डोंगरेवाडी अंगणवाडी क्र.२६) यांना जिल्हास्तरीय आदर्श मीनी अंगणवाडी सेविका  पुरस्कार मिळाला.त्याचबरोबर होन्याळी(अंगणवाडी क्र.९४) ता.आजरा येथिल सौ.सुरेखा नामदेव जाधव यांना जिल्हास्तरीय आदर्श अंगणवाडी सेविका व सुशिला शिवाजी सुतार यांना जिल्हास्तरीय आदर्श मदतनीस पुरस्कार मिळाला.या सर्व पुरस्कार विजेत्यांना जि.प.सदस्या व महिला-बालकल्याण समिती सदस्या या.सुनिता रमेशराव रेडेकर यांच्या हस्ते "तारांगणा" पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी महिला बालकल्याण सभापती सौ.वंदना मगदुम,जि.प. सदस्या पद्माराणी पाटील, वंदना पाटील,शिवाणी भोसले,उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ,आजरा-गडहिंग्लज प्रकल्प अधिकारी गजलवाड,खानापूर उपसरपंच युवराज जाधव,आजरा पं.स.च्या सुपरवायजर लता केसरकर,माया ढेकळे, मनिषा कांबळे,लतीका देसाई उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment