चंदगड / प्रतिनिधी
एकामागोमाग एक मुंबई, ठाणे मधील कापड गिरण्या बंद करण्यात आल्या. 1991 मधील सरकारने शहर विकास नियंत्रण नियमावलीमध्ये बदल केला. त्यामुळे कापड व्यवसायावर गंडातर आले. कायदेशीररित्या गिरण्यांच्या जमिनीतील काही हिश्यात कामगारांना घरांसाठी जमीन मोफत देणे बंधनकारक आहे. पण गिरणीच्या जागांपैकी 85 टक्के जमीन संगणमताने मालकांनी आपल्या घशात घातल्या आहेत. याचा जाब विचारण्यासाठी येत्या 28 फेब्रुवारी 2019 रोजी मुंबई येथे मोर्चा काढण्यात येणार असल्याचे दत्तु अत्याळकर यांनी सांगितले. कोवाड व हलकर्णी येथे आय़ोजित गिरणी कामगार व पेन्शनरांच्या बैठकीत ते बोलत होते.
श्री. अत्याळकर पुढे म्हणाले, ``आता हे सरकारसुध्दा गिरणी कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. सत्तेवर आल्यानंतर या सरकारने एकही घर बांधले नाही. "लाँटरी काढा" या फसव्या म्रुगजळाच्या लागलो तर गिरणी कामगार व वारसांना पिढ्यानपिढ्या वाट बघावी लागले. सरकारने गिरणी कामगार कींवा वारसांना घर हक्क पत्र द्यावे. प्रा. चंद्रशेखर प्रभू हे गिरणी कामगारांच्या प्रश्नी कामगारांच्या बाजूने राहून मुंबई येथील आझाद मैदानावर येत्या 28 रोजी काढण्यात होणऱ्या मोर्चामध्ये मार्गदर्शन करतील.`` या मोर्चात गिरणी कामगार व वारसांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे. यावेळी दत्तु आत्याळकर, अनंत कुलकर्णी, रामजी देसाई, गोपाळ गावडे, वसंत गणाचारी, जानबा बोकडे, कल्लापा जोशी, कृष्णा खोराटे, हणमा खामकर, शामराव भोसले उपस्थित होते.
No comments:
Post a Comment