चंदगड / प्रतिनिधी
आपल्याला नोकरी मिळत नाही, या नैराश्येतून प्रदिप मनोहर पाटील (वय-22, रा. ढोलगरवाडी, ता. चंदगड) याने रहात्या घराच्या तुळीला गळफास घेवून आत्महत्या केली. शुक्रवारी (ता. 22) साडेदहा ते शनिवारी (ता. 23) सात वाजता दरम्यानच्या मुदतीत हि घटना घडली. मनोहर पाटील यांनी याबाबतची वर्दी चंदगड पोलिसात दिली आहे.
यासंदर्भात माहीती अशी – प्रदिप पाटील हा नोकरीच्या शोधात होता. त्याला नोकरी लागत नसल्याने शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता त्याने नैराश्येपोटी रहात्या घरातील माळ्यावरील तुळईला गळफास घेवून आत्महत्या केली. शनिवारी घरच्या मंडळींना हा सर्व प्रकार समजला. घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली असून पो. हो. कॉ. श्री. चव्हाण तपास करीत आहेत.
No comments:
Post a Comment