कोनेवाडी येथे शाळा शताब्दी महोत्सव व वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

23 February 2019

कोनेवाडी येथे शाळा शताब्दी महोत्सव व वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन


चंदगड / प्रतिनिधी 
कोनेवाडी (ता. चंदगड) येथे मंगळवार 26 फेब्रुवारी 2019 रोजी सकाळी अकरा वाजता शाळा शताब्दी महोत्सव व वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहीती शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी दिली.  
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रामध्ये डीजीटल वर्गाचे उद्घाटन आमदार संध्यादेवी कुपेकर, नूतन कार्यालयाचा शुभारंभ माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील, सरस्वती पुतळा अनावरण भाजप नेते रमेशराव रेडेकर, तैलचित्र अनावरण गोपाळराव पाटील यांच्या हस्ते, प्रवेशद्वार उद्घाटन गौकुळचे संचालक राजेश पाटील, संगणक कक्ष उद्घाटन जि. प. चे शिक्षण सभापती अमरीश घाटगे, विज्ञान प्रयोगशाळा उद्घाटन संघटक संग्राम कुपेकर, देणगीदार फलक अनावरण सभापती बबनराव देसाई, दफ्तरमुक्त वर्ग उद्घाटन पोलिस निरिक्षक एस. एम. यादव, सुशोभित वर्ग उद्घाटन प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे, ग्रामदैवत पुजन नरसु गावडे व मारुती गावडे, ग्रंथ पूजन विठोबा गावडे व काशिनाथ शिंदे, ग्रंथ दिंडी पूजन राजकुमार सुतार व पालखी पूजन परशराम गावडे यांच्या हस्ते होईल. सरपंच ज्ञानदेव गावडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. 

दुसऱ्या सत्रामध्ये वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाला रात्री आठ वाजता प्रारंभी होईल. सिमको चे मॅनेजर परशराम धुमाळे यांच्या हस्ते स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. दुध संस्था संचालक विठोबा गावडे अध्यक्षस्थानी असतील. डॉ. सी. डी. शिंदे, डॉ. सुनिल शिंदे, डॉ. व्ही. डी. पाटील, डॉ. संदिप शिंदे, डॉ. राजश्री चव्हाण यांच्या हस्ते दिपप्रज्वलन होईल. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विलास धुमाळे, उपाध्यक्ष भगवंत पाटील,  मुख्याध्यापक विष्णू पाटील व शिक्षक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष सदानंद पाटील यांनी केले आहे. 

No comments:

Post a Comment