एखादे काम मनापासून केल्यास यश निश्चित मिळते - अनिरुध्द रेडेकर - चंदगड लाईव्ह न्युज

23 February 2019

एखादे काम मनापासून केल्यास यश निश्चित मिळते - अनिरुध्द रेडेकर

नागरदळे (ता. चंदगड) येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना रेडकर फौंडेशनचे उपाध्यक्ष अनिरुद्ध रेडेकर यांच्या हस्ते परीक्षा पॅडचे  वाटप करताना. शेजारी इतर मान्यवर.
दौलत हलकर्णी / प्रतिनिधी 
कोणतीही गोष्ट मनापासुन केल्यास यश निश्चित मिळते. दहावीची परीक्षा आयुष्यातील पहीली पायरी असल्याचे प्रतिपादन केदारी रेडकर फौंडेशनचे उपाध्यक्ष अनिरुद्ध रेडेकर यांनी केले. शिवसेना आणि युवासेना यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत नागरदळे (ता. चंदगड) येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा पॅडचे  वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी युवासेना चंदगड तालुका प्रमुख प्रताप पाटील, नागनाथ हायस्कूलचे अध्यक्ष एन. व्ही. भोसले, मुख्याध्यापक श्री. कांबळे, शिवसेना शाखाप्रमुख परशुराम मुरकुटे, उपशाखाप्रमुख विजय पाटील, गटप्रमुख राजु मनगुतकर, संजय पाटील, सुशांत कांबळे व शिवसेना उपतालुका प्रमुख किरण कोकितकर उपस्थित होते. यावेळी श्री. रेडेकर यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत उज्ज्वल यश मिळवण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment