माणगाव येथे संत निरंकारी मंडळ कोलिकच्या वतीने स्वच्छता अभियान - चंदगड लाईव्ह न्युज

23 February 2019

माणगाव येथे संत निरंकारी मंडळ कोलिकच्या वतीने स्वच्छता अभियान

माणगाव (ता. चंदगड) येथे संत निरंकारी मंडळाच्या वतीने आयोजित स्वच्छता मोहिमेचे उदघाटन करताना सरपंच सौ. अश्विनी कांबळे व साधक.
तेऊरवाडी / प्रतिनिधी
संत निरंकारी मंडळ दिल्ली शाखा कोलीक व सेक्टर गडहिंग्लज यांच्या वतीने माणगाव (ता .चंदगड) येथे  स्वच्छता आभियान राबविण्यात आले. यावेळी सेवा दल युनिट नं .११८२ व समस्त साधनसंगत चंदगड तालुका यांच्या मार्फत माणगाव येथील श्री माणकेश्वर देवालय व प्राथमिक आरोग्य केंद्र परिसर स्वच्छ करण्यात आला. गुरूपूजा दिवसानिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला. स्वागत सरपंच व कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ. अश्वीनी कांबळे व  प्रा. आ .केंद्राचे वैद्यकिय अधिकारी  डॉ. अरविंद पठाणे यांनी केले. या कार्यक्रमाला बाबू दूकळे, पंचायत समिती माजी सदस्य  अनिल सुरूतकर, तंटामुक्त अध्यक्ष जयवंत सुरूतकर, ग्रा. प. सदस्य बाळू नाईक, सदस्या कमल होनगेकर, पार्वती चिंचणगी, शिवाजी पाटील, विश्वनाथ वगराळे, आप्पाजी चिंचणगी, वैजनाथ होणगेकर, जयवंत कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. निरंकारी मंडळाच्या वतीने ब्रँचमुखी महात्माजी, सेवा संचालक, सेवादल, साधनसंगत असे प्रत्येक भागातून येऊन स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.

No comments:

Post a Comment