माणगाव / प्रतिनिधी
मलगड (ता. चंदगड) येथील झेटींगदेव यात्रा रविवार २४ फेब्रुवारी 2019 रोजी होणार असल्याचे देवस्थान कमिटीने निश्चित केली आहे. दुपारी १२ वाजता गावातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. यावेळी अनेक पारंपारिक प्रथा व विधी पार पाडण्यात येणार आहेत. संध्याकाळी ७ वाजता मानाचा गाराणा घालण्यात येणार आहे. तर देवाच्या नामघोषात रातजागर आयोजित केला आहे. यात्रेच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या सोहळ्याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे ग्रामस्थांनी केले आहे.
No comments:
Post a Comment